श्रीलंका येथेही एखादा (सनातन) आश्रम असावा ! – कन्हैया दिनेश्‍वरन्

श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी भारतातील हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !
– सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात मान्यवरांचे घणाघाती वक्तव्य

‘श्रीलंका येथे एखादा आश्रम असावा. तेथे गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) यावे आणि त्यांच्या वतीने तेथे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जावे, तसेच हिंदूंमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे. ‘श्रीलंकेतील हिंदू एकटे नाहीत. भारतातील हिंदू त्यांच्यासमवेत आहेत’, असा विश्‍वास आम्हाला द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे’, असे कन्हैया दिनेश्‍वरन् म्हणाले.

 

अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र का हवेे ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

डावीकडून पू. सिरियाक वाले, पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, श्री. कन्हैया दिनेश्‍वरन्, श्री. काशी आनंदन्

प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून श्रीलंकेतील अधर्माचे राज्य नष्ट केले; मात्र आज श्रीलंकेतील हिंदूंवर पुन्हा संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत आहेत. श्रीलंकेतील हिंदू भारताकडून साहाय्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीलंकेतील हिंदु धर्माच्या रक्षणासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र त्यांना आवश्यकता आहे नैतिक, आर्थिक आणि राजकीय पाठिंब्याची ! अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या श्रीलंकेतील कार्यरत हिंदु धर्मविरांनी श्रीलंकेतील हिंदूंच्या दुःस्थितीविषयी उपस्थितांना अवगत केले.