परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली

कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल, याची शाश्‍वती वाटते. वाराणसी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील त्रिवेणी संगमात स्नान केल्याने शक्ती मिळते. मानवातील षड्रिपू जाळून टाकण्याचे स्थळ म्हणजे वाराणसी. मनुष्य जीवन जगतांना प्रत्येकाने फुल बनून सुगंध पसरवायला हवा. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीरुपी माळेमध्ये एक फुल बनायला हवे. इथून जातांना प्रत्येकाने हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी कार्य करण्याची प्रेरणा घेऊन जा, असे आवाहन कर्नल अशोक किणी यांनी केले.

 

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी गौरवोद्गार !

श्री. जितेंद्र ठाकूर, प्रदेश महामंत्री, अखिल भारतीय हिंदू महासभा, मध्यप्रदेश

‘सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा आहे. त्यांच्यासारखे प्रत्येकाने स्वतःचे दायित्व पार पाडले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस दूर नाही.’ – श्री. जितेंद्र ठाकूर, प्रदेश महामंत्री, अखिल भारतीय हिंदू महासभा, मध्यप्रदेश