समाजात मनोरंजनासाठी केलेले गायनाचे कार्यक्रम आणि प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात सादर केलेली गायनसेवा यांत जाणवलेला भेद !

गायन सेवा सादर करतांना सौ. सीमंतिनी बोर्डे

‘आतापर्यंतच्या आयुष्यात मी बरेच ‘स्टेज’ कार्यक्रम केले आहेत आणि विविध प्रसंगी गायन केले आहे. गेल्या २० वर्षांपासून मला वाटत असे, ‘मी गायन-वादन शिकलेे आहे. ती कला ईश्‍वरचरणी समर्पित करावी.’ मी ७ वर्षे संभाजीनगर येथील प.पू. कलावतीआईंच्या केंद्रात भजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी गायन, तसेच वादन सेवा मनापासून करत असे. त्याचेच फळ म्हणून आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या छत्रछायेखाली आलो. प.पू. देवबाबांकडे मला गायनसेवा सादर करायला मिळणार असल्याने ‘या माध्यमातून देवानेच मनातील इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले. ‘समाजात श्रेष्ठ दर्जाचे गायक कलाकार असूनही देवाने माझी पात्रता नसतांना मला संधी देऊन माझ्यावर अपार कृपावर्षाव केला’, याची मला जाणीव होऊन मन सद्गदित होत होते.

मी आतापर्यंत समाजात मनोरंजनासाठी केलेले गायनाचे कार्यक्रम आणि प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात सादर केलेली गायनसेवा यांत मला जाणवलेला भेद पुढे देत आहे.

(‘यातूनच आध्यात्मिक स्तरावरील कलेच्या उपासनेचे महत्त्व लक्षात येते.’ – कु. तेजल पात्रीकर)

– सौ. सीमंतिनी बोर्डे, संभाजीनगर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात