सप्तम अखिल भारतीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी वाईट शक्तींमुळे आलेले अडथळे आणि साधकांनी अनुभवलेली ईश्‍वरी कृपा !

 

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये वीज जात होती, तसेच एकाच ‘फेज’ची वीज सातत्याने बंद होत होती. गेल्या ६ वर्षांपासून अधिवेशनांच्या आयोजनाच्या कालावधीत इतक्या वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत नव्हता. या वेळी प्रथमच अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला.

२. ‘हॅलोजन’ आणि ध्वनीवर्धक यंत्रणेतही मध्ये मध्ये व्यत्यय येत होता.

३. ‘युपीएस्’वर दिलेला विजेचा भार अल्प असतांनाही तो सातत्याने ‘ट्रीप’ होत होता.

४. विद्युतजनित्राला (‘जनरेटर’ला) कोणतीही अडचण नसतांना तो वारंवार बंद पडत होता.

५. एका साधिकेचा अपघात होऊन तिच्या मेंदूला मार लागला.

६. अधिवेशनाला येणार्‍या एका मान्यवर अधिवक्त्यांच्या विमानाचे उड्डाण होण्यात अडचण येत होती.

७. वक्त्यांवर आवरण येत होते आणि त्यांना सुचत नव्हते.

८. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपिठावर चढत असतांना व्यासपिठाच्या ठिकाणी अचानक दाब निर्माण झाला. त्यांनी मार्गदर्शन चालू केल्यावर दाब कमी झाला.

९. वाईट शक्तींकडून अनेक अडथळे येऊनही प्रचंड प्रमाणात ईश्‍वरी चैतन्य कार्यरत असल्याचे जाणवले. वक्त्यांचे विषय प्रभावी झाले, तसेच उपस्थित सर्वच अधिवक्ते सकारात्मक होते. वातावरणात उल्हास आणि चैतन्य जाणवत होते. एकूणच अधिवेशनाच्या कालावधीत देवाचे चैतन्य आणि कृपा अनुभवता आली.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.