श्री शनैश्‍वर मंदिर सरकारीकरणाच्या विधेयकाला माझा विरोध राहील ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते

डावीकडून श्री. सुभाष देसाई यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे आणि सोबत श्री. अतुल अर्वेन्ला

नागपूर – हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होऊ नये, यासाठी मी तुमच्या सोबत राहीन. श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण करण्याचे विधेयक या अधिवेशनात आले, तर माझा त्याला विरोध राहील, असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केले. समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, श्री. अजय संभूस आणि श्री. अतुल अर्वेन्ला यांनी १० जुलै या दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. देसाई यांची भेट घेऊन त्यांना ‘शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा आणि यापूर्वी सरकारीकरण करण्यात आलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत’, या मागणीविषयी निवेदन दिले. या वेळी त्यांनी वरील मत मांडले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात