पुणे येथे मंदिर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे, ६ मे (वार्ता.) –  मंदिरांना हिंदु धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. ‘हिंदूंसाठी मंदिरे ही ऊर्जास्रोत आहेत’, असे संतांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही मंदिरांची सुरक्षा आणि जीर्णोद्धार, तसेच नियमित आचारांची सोय केली होती; परंतु आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंकडून मंदिरांकडे दुर्लक्ष होत आहे. हिंदूंमध्ये मंदिराविषयी भावनिर्मिती व्हावी, देवतांविषयी कृतज्ञताभाव निर्माण व्हावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुणे शहरातील विविध भागात सामूहिक मंदिर स्वच्छतेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग वाढत आहे.

भारती विद्यापीठ येथील श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिराची स्वच्छता करतांना महिला

१. २ मे या दिवशी भारती विद्यापीठ येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. यामध्ये नियतकालिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. वैशाली लोखंडे आणि सौ. कविता जगताप यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

तळेगाव येथील श्री सूर्यमुखी गणेश मंदिराची स्वच्छता करतांना

२. २ मे या दिवशी तळेगाव येथील सूर्यमुखी गणेश मंदिराची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. त्या वेळी गावातील जिज्ञासू उषा सांडभोर, मंगल पवार आणि अल्का धंद्रे यांनी मंदिराच्या स्वच्छतेत सहभाग घेतला. सर्व जिज्ञासूंनी सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळाल्याचे सांगितले.

२८ एप्रिलला श्री तुळजाभवानी देवी मंदिर, भारती विद्यापीठ, २९ एप्रिलला जानुबाई मंदिर, धनकवडी, तर १ मे या दिवशी श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर, भारती विद्यापीठ येथेही स्वच्छता करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात