निपाणी येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन !

‘गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमी’ येथे मार्गदर्शन करतांना आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे

निपाणी (कर्नाटक) – येथे ‘गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमी’त ३ एप्रिल या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ ३० विद्यार्थ्यांनी घेतला. ‘गुरुकुल करिअर अ‍ॅकॅडमी’चे संचालक श्री. चारुदत्त पावले यांनी आभारप्रदर्शन केले.

विशेष

१. मनाची एकाग्रता कशी साध्य करायची, या संदर्भात सर्वांकडून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करवून घेण्यात आला. अनेकांनी चांगले अनुभव आल्याचे सांगितले.

२. संचालक श्री. चारुदत्त पावले यांनी ‘आधुनिक विज्ञान, आधुनिकता याविषयी माहिती देणारे अनेकजण आहेत; पण आनंद कसा मिळवायचा, याविषयी सनातन संस्थाच माहिती देते. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात