कोल्हापूरवासियांचा भव्य हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार !

१ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती

श्री महालक्ष्मीदेवीचे चित्र असलेली पालखी

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेली पालखी

कोल्हापूर – हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, या उद्देशाने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत आहेत. त्यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनां’च्या वतीने ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत १३ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरांतील प्रमुख मार्गावरून ‘भव्य हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ मिरजकर तिकटीपासून होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिची सांगता झाली. दिंडीत सनातन धर्मध्वजाखाली पुरोगाम्यांचा विरोध झुगारून आणि जातपात-संप्रदाय आदी भेद विसरून अनेक धर्मप्रेमी ‘हिंदु’ या नात्याने सहभागी झाले होते. दिंडी मार्गातील काही प्रमुख चौकांमध्ये धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे दिंडीत महिलांनी भगवी वस्त्रे परिधान करून भगवे ध्वज हातात घेतल्यामुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. दिंडीत सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात