परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर कुंकवाचा टिळा (नाम) लावून गेल्याने त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘४ ते ८ मे २०१८ या कालावधीत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘नवग्रह शांती’, ‘अघोरास्त्र याग’, ‘संधी शांती’ आणि ‘साम्राज्य लक्ष्मी याग’ हे ४ विधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात येत आहेत. त्यांपैकी ४.५.२०१८ या दिवशी ‘नवग्रह शांती’ करण्यात आली. त्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर कुंकवाचा टिळा (नाम) लावण्यात आला. त्यांनी कपाळाला टिळा लावल्यामुळे त्यांच्यावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ४.५.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावण्यापूर्वी आणि त्यांनी टिळा लावल्यानंतर, तसेच ते यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांनी टिळा लावलेला असतांना अन् टिळा पुसल्यावर त्यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या goo.gl/Kq3ocC या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

‘नवग्रह’ शांती या यज्ञविधीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी टिळा लावला होता.

 

२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा न आढळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावण्यापूर्वी आणि नंतरही त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळल्या नाहीत. तसेच ते यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांनी टिळा लावलेला असतांना आणि टिळा पुसल्यावरही त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

२ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावण्यापूर्वी त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे असणे (स्कॅनरच्या भुजा १८० अंश उघडणे) आणि त्यांनी टिळा लावल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावण्यापूर्वी त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्यांच्या संदर्भात ‘यू.टी.एस्.’ उपकरण (स्कॅनरच्या भुजा) पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंश कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती ११ मीटर होती. त्यांनी टिळा लावल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत १.१० मीटर वाढ होऊन ती १२.१० मीटर झाली. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कपाळावर टिळा लावल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी वाढ झाली.

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांनी कपाळावरील टिळा पुसल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी थोडी वाढ होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांनी कपाळावर टिळा लावलेला असतांना त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा मोजतांना स्कॅनरच्या भुजा पूर्णपणे उघडून त्याने १८० अंश कोन केला. त्यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली. ती १२.४५ मीटर होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कपाळावरील टिळा पुसल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ०.३५ मीटर वाढ होऊन ती १२.८० मीटर झाली. याचा अर्थ धार्मिक विधी झाल्यानंतर त्यांनी कपाळावरील टिळा पुसल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणखी थोडी वाढ झाली.

२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावण्यापूर्वी त्यांची एकूण प्रभावळ १२ मीटर होती. त्यांनी टिळा लावल्यानंतर त्यांच्या प्रभावळीत १.६५ मीटर वाढ होऊन ती १३.६५ मीटर झाली.

२ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर कपाळावरील टिळा पुसल्यावर त्यांच्या एकूण प्रभावळीत आणखी थोडी वाढ होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर कपाळावर टिळा लावलेला असतांना त्यांची प्रभावळ १५.७० मीटर होती. त्यांनी टिळा पुसल्यावर त्यांच्या प्रभावळीत ०.३० मीटर वाढ होऊन ती १६.१० मीटर झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. पुरुषांनी कुंकवाचा उभा टिळा (नाम) लावण्याचे महत्त्व

‘पुरुषांनी लावावयाचा कुंकवाचा उभा टिळा (नाम) हा शिवतत्त्वाच्या प्रकट शक्तीचे प्रतीक आहे. पुरुष हा शिवाचा प्रतीक आहे. पुरुष आपल्या आज्ञाचक्रावर कुंकवाचा उभा टिळा लावतो. पुरुषरूपी जीव कपाळावर लावलेल्या उभ्या टिळ्यातून आपल्यातील शिवतत्त्वाची पूजा करतो. लाल कुंकवाचा टिळा शिवतत्त्वाच्या प्रकट शक्तीचे प्रतीक आहे. कुंकवाच्या उभ्या टिळ्याच्या वरच्या टोकाकडून शिवाची प्रकट शक्ती बाहेर पडते.’ – एक विद्वान, १२.११.२००५ (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी’)

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावल्यानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ होण्यामागील कारण

‘सूत्र ४ अ’ यातून ‘कुंकवाचा टिळा लावल्याने पुरुषांना शिवतत्त्वाची प्रकट शक्ती, म्हणजे चैतन्य मिळते’, हे समजते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावल्यावर त्यातून त्यांना सगुण चैतन्य मिळाल्याने त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ वाढली. यातून ‘प्रत्येक पुरुषाने कपाळावर कुंकवाचा टिळा लावणे का आवश्यक आहे’, ते लक्षात येते.

३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांच्या कपाळावरील टिळा पुसल्यावरही त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ होण्यामागील कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर त्यांच्या कपाळावरील टिळा पुसल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली. याचे कारण परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असल्याने ते त्रिगुणातीत झाले आहेत. ते अधिकतर निर्गुण स्थितीत असतात. आवश्यकतेप्रमाणे ते सगुणात येतात. ‘नवग्रह शांती’ हा यज्ञविधी झाल्यानंतर त्यांनी कपाळावरील टिळा पुसल्यावर ते सगुणातून निर्गुणात गेल्याने त्यांच्यातील चैतन्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे त्यांनी यज्ञस्थळी जाऊन आल्यानंतर कपाळावरील टिळा पुसला, तेव्हा त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत आणि एकूण प्रभावळीत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. यज्ञविधीसारखे कर्मकांड हे सगुणातील आहे. ते करतांना कर्मकांडातील नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे तेव्हा आवश्यकतेनुसार टिळा लावल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ वाढली.

सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे संतांनी आचारधर्माचे पालन करणे आवश्यक नाही; परंतु तरीही ते आचारधर्माचे पालन करतात. त्यांचे हे वागणे समाजाला शिकवण्यासाठी असते. त्यामुळे समाजाला धर्माचरण करण्याची प्रेरणा मिळते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.५.२०१८)

ई-मेल : [email protected]