सनातन संस्था, सनातनची शिकवण आणि उत्तरदायी साधक यांच्याविषयी विकल्प पसरवणार्‍यांपासून सावध रहा !

साधकांना महत्त्वाची सूचना

‘एका शहरात पूर्वी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे; मात्र सध्या विकल्पामुळे सनातनपासून दुरावलेले काही लोक सनातन संस्था, सनातनची शिकवण, तसेच उत्तरदायी साधक यांच्याविषयी विकल्प पसरवत असल्याचे दिसून आले आहे. हे लोक सनातनच्या साधकांकडे जातात, त्यांच्याशी गोड बोलून सनातनच्या कार्यपद्धती, सनातनमध्ये सांगितली जात असलेली साधना, साधक करत असलेली सत्सेवा यांविषयी साधकांमध्ये विकल्प निर्माण होईल, अशा प्रकारे बोलतात. सध्या अशा विकल्पात गेलेल्या लोकांकडून एका संप्रदायाचा प्रसार चालू आहे.

१. सनातनविषयी विकल्प पसरवणारी काही सूत्रे

अ. सनातन हे डबके आहे, तर आमचा संप्रदाय अथांग सागर आहे.

आ. इथे कोणता आढावा द्यायचा नाही कि सारणी भरायची नाही. केवळ ५ आज्ञा पाळायच्या.

इ. सनातन हा कच्चा रस्ता आहे, तर आमचा संप्रदाय हा अतीजलद महामार्ग आहे.

ई. आमच्या संप्रदायात बाकीच्या भानगडी नाहीत. (येथे ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती’ यांचे कार्य करण्याला ‘भानगडी’ असा शब्दप्रयोग वापरला आहे.) केवळ मोक्षप्राप्ती हे ध्येय आहे. (आज राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता असतांना स्वतः ती न करणारे आणि ती करणार्‍यांचे खच्चीकरण करणारे कोणत्या पात्रतेचे आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)

उ. येथे जाहिराती गोळा कराव्या लागत नाहीत, अर्पण मागत फिरावे लागत नाही, सारण्या (अहवाल) भराव्या लागत नाहीत, आढावे द्यावे लागत नाहीत. केवळ ठराविक काळ साधना करावी लागते. (अध्यात्मात प्रगती करण्यासाठी अहं निर्मूलन होणे आवश्यक असते. या सेवा म्हणजे अहं निर्मूलन करण्याची माध्यमे आहेत. सनातनच्या टीकाकारांनी हे समजून घेऊन साधना केली असती, तर त्यांचीही साधना झाली असती ! – संपादक)

२. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र
झटणार्‍या सनातन संस्थेविषयी विकल्प पसरवणे, हे महापाप !

सनातन संस्थेत गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली जाते. व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे. सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करून आतापर्यंत ११२१ साधकांनी ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली असून ७७ साधक संतपदावर आरूढ झाले आहेत. सनातनने केलेल्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यामुळे शेकडो साधकांना अनुभूती येऊन त्यांचे आयुष्य आनंदी बनले आहे. ‘सनातनमध्ये राहून साधना करतांना स्वतःची प्रगती का झाली नाही ?’, याचे चिंतन करण्याऐवजी सनातनला ‘डबके’, ‘कच्चा रस्ता’ यांसारख्या उपमा देऊन खिल्ली उडवणे, हे तीव्र बहिर्मुखतेचे लक्षण होय.

३. अशा प्रकारे कोणी विकल्प पसरवत असल्यास त्वरित उत्तरदायी साधकांना कळवा !

एखाद्या व्यक्तीने एखाद्या संप्रदायानुसार साधना करणे किंवा त्या संप्रदायाचा प्रसार करणे, याविषयी सनातनला कोणताही आक्षेप नाही; मात्र या संप्रदायाच्या आडून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र झटणार्‍या सनातन संस्थेविषयी विकल्प पसरवणे, हे महापापच होय. अशा विकल्प पसरवणार्‍यांपासून साधकांनी सावध रहावे. अशा प्रकारे कोणी विकल्प पसरवत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित उत्तरदायी साधकांना कळवावे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात