शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यात वधू-वरांना सनातन संस्थेकडून श्री गणेशाचे सात्त्विक चित्र भेट

वधू-वरांना श्री गणेशाचे चित्र देतांना डावीकडून श्री. बळवंत पाठक आणि श्री. सुरेश पुरोहित

महाड (जिल्हा रायगड) – महाड, माणगाव आणि पोलादपूर या विभागांतील शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची कन्या चि.सौ.कां. कोमल हिचा विवाहसोहळा चि. ओकार मोरे यांच्या समवेत २८ एप्रिलला झाला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री गणेशाचे सात्त्विक चित्र वधू-वरांना भेट देण्यात आले. या वेळी सनातनचे साधक श्री. सुरेश पुरोहित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक, श्री. समीर पुरोहित उपस्थित होते. शेवटी सनातन संस्थेच्या वतीने आमदार गोगावले यांची भेट घेण्यात आली.

क्षणचित्रे

१. आमदार गोगावले यांचा जनसंपर्क अधिक असल्याने स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरीही विवाहविधी मुहुर्तावरच पार पडला.

२. मराठी अस्मिता जागृत करणारे भगव्या रंगाचे फेटे सर्व उपस्थितांना बांधण्यात आले होते, तसेच शिवशाहीची आठवण करून देणार्‍या तुतार्‍या वाजवून सर्वांचे स्वागत केले जात होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात