‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ यावर सनातन संस्थेचे मार्गदर्शन

शहाजीनगर (तालुका इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर
कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सनातनच्या कार्याचे कौतुक !

डावीकडे श्री. धनंजय माने आणि त्यांच्यासमोर १. श्री. आप्पासाहेब सांगोलकर आणि उपस्थित अन्य अधिकारी अन् कर्मचारी

शहाजीनगर (जिल्हा पुणे) – येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना सनातनचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ याविषयी अवगत केले. उपस्थितांनी काळानुसार नामजप कोणता करावा याविषयी शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले, तसेच सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुकही केले. ‘आम्हाला नियमित सनातनची सात्त्विक उत्पादने द्या आणि आमच्या बैठकीत सनातनची उत्पादने कर्मचार्‍यांना दाखवून त्यांचे महत्त्व सांगा’, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

या वेळी सर्वश्री नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय माने, मुख्य लेखापाल महादेव राऊत, मुख्य रसायनशास्त्रज्ञ आत्माराम पवार, पत्रकार राजेंद्र देशमुख, शेती अधिकारी कल्याण पताळे, वीजपुरवठा अधिकारी धनंजय लिंबोरे, नाना बागल, संभाजी देवकर आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात