चेन्नई येथे कौटुंबिक स्नेहसंमेलनामध्ये सनातन संस्थेकडून मार्गदर्शन

श्री. बालाजी

चेन्नई – बीएन्आय’ या व्यापारी गटाने ७ एप्रिल २०१८ या दिवशी येथील एका रिसॉर्टमध्ये कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. बालाजी यांनी सत्संग आणि साधना यांचे महत्त्व सांगितले, तसेच साधना केल्याने त्यांना आलेल्या अनुभूती कथन केल्या. श्री. जयकुमार यांनी तणाव व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले, तर सौ. कल्पना बालाजी यांनी तमिळ नववर्ष, अक्षय्य तृतीया हे सण साजरे करण्यामागचे महत्त्व सांगितले. याशिवाय नामजपाचे महत्त्व आणि प्रत्येक कृतीला साधनेची जोड कशी द्यायची, यांविषयीही मार्गदर्शन केले. श्री. बालाजी हे बीएन्आय’ या व्यापारी गटाचे सदस्य आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

क्षणचित्रे

१.डॉ.दिव्या यांनी त्यांच्या पतीसमवेत तणाव व्यवस्थापनावरील पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ जाणून घेतले.

२. या कार्यक्रमामध्ये अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगणार्‍या पत्रकांचे वितरण करण्यात आले.

 

पुलिवालम् (तमिळनाडू) येथे साईबाबा
महाभिषेक कार्यक्रमात सनातन संस्थेकडून मार्गदर्शन

चेन्नई – पुलिवालम् येथील साईबाबा मंदिरात महाभिषेक करण्यात आला.  अभिषेक आणि पूर्णाहुती झाल्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने सौ. कल्पना बालाजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. या समवेतच त्यांनी तमिळ नववर्ष आणि अक्षय्य तृतीया यांचे महत्त्वही सांगितले. या मार्गदर्शनाचा लाभ ५० हून अधिक भाविकांनी घेतला. या वेळी सनातनचे श्री. बालाजी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात