चेन्नई येथे सनातन संस्थेच्या सत्संग सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

चेन्नई – सनातन संस्थेच्या वतीने येथील श्री. प्रभाकरन् यांच्या निवासस्थानी  नुकतेच विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भावपूर्ण सत्संग सोहळ्याला ३० हून अधिक साधक उपस्थित होते.

या वेळी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करतांना दैनंदिन जीवनात येणार्‍या प्रसंगांतून कसे शिकायला मिळाले’, याविषयी सांगितले. सनातनच्या साधिका सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘गुरुकृपायोगाचे महत्त्व’ याविषयी माहिती दिली. श्री. प्रभाकरन् यांनी आश्रमातील वास्तव्याच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे कथन केली. सूत्रसंचालन सौ. कल्पना आणि सौ. सुधा यांनी केले.

क्षणचित्रे

१. या सोहळ्यात श्री. प्रभाकरन् आणि श्री. जयकुमार यांच्या कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

२. उपस्थितांपैकी अनेक जणांनी असे सत्संग पुन्हा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात