केरळमध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

एर्नाकुलम् (केरळ) – येथील मरिन ड्राइव्ह येथे १ ते ११ मार्च या कालावधीत आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सनातनच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा या ग्रंथप्रदर्शनामध्ये अध्यात्म, देवतांची पूजा, पालकत्व, व्यक्तीमत्त्व विकास, स्वभावदोष निर्मूलन, आयुर्वेद आणि इतर अनेक विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या वेळी सनातनचे ग्रंथ इतरांपेक्षा वेगळे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

क्षणचित्रे

१. या ठिकाणी धर्मशिक्षणाविषयी फलक लावण्यात आले होते. त्याविषयीची माहिती वाचून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच काहींनी छायाचित्रेही काढून घेतली.

२.  प्रदर्शनाला एकदा भेट देऊन गेलेली व्यक्ती पुन्हा येऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती.

३. सनातनचे ‘दोष आणि अहं निर्मूलन’, ‘बिंदूदाबन’, ‘विकारनिर्मूलनासाठी नामजप’ इत्यादी ग्रंथ लोकांसाठी आकर्षण ठरले.

४. ‘सनातनच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये वेगळे जाणवते आणि अतिशय चांगले वाटते’, अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात