शिरढोण येथील स्मशानभूमीत अंत्यविधींच्या संदर्भात धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेच्या १८ प्रबोधनात्मक फ्लेक्सचे अनावरण

स्मशानभूमीत लावलेले फ्लेक्स

शिरढोण (रायगड) – येथील महामार्गाजवळील स्मशानभूमीत सनातन संस्थेच्या वतीने अंत्यविधींच्या संदर्भात धर्मशिक्षण देणारे प्रबोधनात्मक १८ फ्लेक्स २७ मार्च या दिवशी लावण्यात आले. धर्मप्रेमी साधक श्री. विनायक वाकडीकर यांनी स्मशानभूमीतील फ्लेक्सविषयी सांगितल्यावर अष्टविनायक दर्शन ग्रुपचे धर्मप्रेमी सर्वश्री दिलीप पवार, गजानन माळी, संतोष पवार यांनी ते प्रायोजित करण्यास पुढाकार घेतला.

ते म्हणाले, ‘‘फ्लेक्सच्या माध्यमातून गावातील लोकांना अंत्यविधीमागील शास्त्र आणि विधी कसे करावे, याचे धर्मशिक्षण फलकांच्या माध्यमातून मिळेल.’’ अनावरणप्रसंगी धर्मप्रेमी श्री. विनायक वाकडीकर आणि श्री. मच्छिंद्र पवार उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात