कन्या पूजन आणि भोजन समारंभात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग

अमरावती येथे संपादक अनिल अग्रवाल यांचा
५ सहस्र १०० कन्या पूजन आणि भोजन यांचा कार्यक्रम पार पडला

अमरावती – येथील संध्याकाळ दैनिक मंडल आणि दैनिक मातृभूमीचे संपादक अन् मालक श्री. अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी चैत्र नवरात्रामधील दुर्गाष्टमी या दिवशी २ सहस्र १०० कन्या पूजन आणि भोजन यांचा मानस करून समारंभ आयोजित केला होता; परंतु एकूण ५ सहस्र १०० मुली समारंभात सहभागी झाल्या. यामध्ये श्री. अनिल अग्रवाल यांनी ‘मित्र, नातेवाईक आणि हिंतचिंतक यांच्या सहकार्यामुळेच मी हा ऐतिहासिक समारंभ पार पाडू शकलो’, असे म्हटले.

पार पडलेले कन्या भोजन

कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. अनिल अग्रवाल यांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग असावा, अशी इच्छा व्यक्त करून त्यानुसार बैठकीलाही बोलावले. कार्यक्रमात सनातन संस्थेच्या ‘शक्ती’ या १ सहस्र लघुग्रंथांचे मुलींना वितरण केले. या वेळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावले होते.

कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे आणि आमदार श्री. अनिल बोंडे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना

क्षणचित्रे

१. श्री. अनिल अग्रवाल यांनी वारंवार हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांचे सहभागाविषयी आभार व्यक्त केले. ते स्वतः पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी घेऊन आले. श्री. अग्रवाल त्यांना ‘सनातनचेे कार्य उत्तम आहे’, असे सांगत होते.

२. ५ सहस्र १०० मुली आणि त्यांचे पालक यांचा सहभाग असूनही कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात