बोईसर (जिल्हा पालघर) येथे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात सनातनचा सहभाग !

कार्यक्रमास उपस्थित महिला

बोईसर (जिल्हा पालघर) – ९ ते १६ मार्च या कालावधीत जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने विविध संघटनांच्या वतीने महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात येथील सालवड, वंजारवाडा, धनानीनगर, तारापूर या भागांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत सनातन संस्थेच्या साधिका सौ. जयश्री अहिरराव आणि सौ. ज्योती कांबळे यांनी  मार्गदर्शन केले. अनेक मान्यवरांसह ८६५ महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

 

पाल्यांना आदर्श नागरिक बनवणे, हे स्त्रीचे दायित्व ! – सौ. जयश्री अहिरराव

आज पालकच पाश्‍चिमात्त्य संस्कृतीकडे आकर्षित झाले आहेत. सात्त्विक पद्धतीने सण साजरे करायचे सोडून आपण पाश्‍चिमात्त्यांचे निरर्थक ‘डे’ साजरे करतो. पाश्‍चात्य देशातही खात नाहीत, असे पदार्थ आपण खातो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लयास जाऊन समाजात अराजकता वाढली आहे. त्यामुळे स्त्रियांवरील आत्याचारही वाढले आहेत. आपल्या पाल्यांना सर्वगुणसंपन्न, धर्माभिमानी, राष्ट्रभक्त आणि आदर्श नागरिक बनवणे हे एक आई म्हणून आपले दायित्व आहे, असे सनातनच्या सौ. जयश्री अहिरराव यांनी केलेल्या मार्गदर्शनात सांगितले.

प्रतिसाद !

१. ‘असे मार्गदर्शन नियमितपणेे मिळाले, तर संस्कार रुजवायला साहाय्य होईल’, ‘तुमचे हे मार्गदर्शन सतत मिळायला पाहिजे’ अशा प्रकारचे अभिप्राय अनेकांनी या वेळी दिले.

२. तारापूर येथील श्रीराम मंदिरात एक धर्मशिक्षणवर्ग चालू करा, अशी मागणी जिज्ञासूंनी या वेळी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात