संभाजीनगर येथे भव्य शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !

धर्मध्वजाचे पूजन करतांना हिंदुत्वनिष्ठ

संभाजीनगर – येथे हिंदु नववर्षानिमित्त समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. हिंदु नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष तथा महापौर श्री. नंदकुमार घोडेले, शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, पूजनीय गुरुवर्य श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून शोभायात्रेला आरंभ झाला. फेरीत सर्वधर्माभिमानी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विविध संघटनांकडून हिंदूंचा पराक्रमी इतिहास दर्शवणारे सजीव देखावे सादर करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली.

संभाजीनगर येथे सनातनच्या वतीने सादर केलेला बालककक्ष

या फेरीत सनातनच्या वतीने सादर केलेला बालककक्ष उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि युवा प्रबोधन मंच यांनी भगवान परशुराम चौक येथे सार्वजनिक गुढी उभारून ‘पृथ्वीवर सर्व्रत्र हिंदू धर्म प्रस्थापित करून अखिल मानव जातीला सुसंस्कृत आणि समृद्धीमय जीवन देण्या’चा निश्‍चय केला. सांगता वन्देमातरम् या गीताने केली. या वेळी श्री. दयारामजी बसैय्ये (आर्य समाज), श्री. अनिल पैठणकर (ब्राह्मण महासंघ), श्री. शाम देशपांडे (अध्यक्ष युवा प्रबोधन मंच), श्री. सुभाष कुमावत, (उपाध्यक्ष युवा प्रबोधन मंच,विश्‍व हिंदू परिषद) श्री. अनिल मकरीये (भाजप) श्री. सारंग टाकळकर (सचिव जनता विकास परिषद) आदी मान्यवर उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात