सनातन संस्थेच्या वतीने पाली (जिल्हा रायगड) येथे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या आणि महिला सबलीकरण या विषयांवर प्रवचन

मार्गदर्शन करतांना सौ. पुष्पा चौगुले

पाली (जिल्हा रायगड) – जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने सुधागड येथे मराठा समाजाच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाज महिलाध्यक्षा, तसेच भाजपच्या तालुका अध्यक्ष सौ. नेहारिका शिर्के यांनी सनातनचे महिलांच्या आरोग्य विषयीच्या समस्या आणि महिला सबलीकरण या विषयांवर प्रवचन घेण्यासाठी सनातन संस्थेच्या साधिकांना निमंत्रित केले होते.

या वेळी सौ. पुष्पा चौगुले यांनी ‘महिला सबलीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सौ. मोहिनी मांढरे यांनी ‘महिलांच्या आरोग्यविषयक समस्या’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ १२५ महिलांनी घेतला.

प्रतिसाद ! : ‘‘पुन्हा आमच्यासाठी अशा प्रवचनाचे आयोजन करा. आपण आमच्या अंगणवाडी महिलांच्या बैठकीत या.’’ असे माजी सभापती सौ. शेळके यांनी, आणि अंगणवाडी सेविका अध्यक्षा यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात