येवला (जिल्हा नाशिक) येथे क्षत्रिय महिला मंडळात सनातनच्या साधिकेचे मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना सौ. वनिता आव्हाड

येवला (जिल्हा नाशिक) – क्षत्रिय महिला मंडळ, येवला यांच्या वतीने १३ मार्च या दिवशी महिला दिनानिमित्त एका महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या वतीने राष्ट्र आणि धर्म या विषयावर आधारीत एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सनातनच्या साधिका सौ. वनिता आव्हाड यांनी विषय मांडून उपस्थितांना राष्ट्र्र आणि धर्म यांविषयी जागरूक करून संघटनाचे महत्त्व विषद केले. या महिला मेळाव्यामध्ये २५० हून अधिक महिला उपस्थित होत्या. या वेळी संस्थेच्या वतीने प्रकाशित ग्रंथांचेे प्रदर्शनही लावण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात