हिंदु संघटनांनी लोकशाहीच्या अपयशाविषयी सतत जागृती करणे आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना पू. नीलेश सिंगबाळ, त्यांच्या उजव्या बाजूला श्री. चेतन राजहंस आणि अन्य मान्यवर

भारत प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्रच होते ! –
पू. नीलेश सिंगबाळ, मार्गदर्शक, पूर्व भारत, हिंदु जनजागृती समिती

बरूराज (बिहार) – भारत प्राचीन काळापासून हिंदु राष्ट्रच होते. त्रेतायुगातील राजा हरिश्‍चंद्र आणि प्रभु श्रीराम, द्वापारयुगातील महाराजा युधिष्ठिर, कलियुगातील राजा हर्षवर्धन, अफगाणिस्तानचा राजा दाहीर, मगधचा सम्राट चंद्रगुप्त, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कधीही ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) नव्हते, तर हिंदु राष्ट्रच होते. वर्ष १९४७ मध्येही ५६६ राजसंस्थाने हिंदु राज्ये होती. वर्ष १९७६ पर्यंत राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द घुसडला गेला. देश ‘सेक्युलर’ आहे कि संविधान ‘सेक्युलर’ आहे कि भारताचा नागरिक ‘सेक्युलर’ आहे, याची कुठलीही व्याख्या भारतीय संविधानात नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. ते येथे ब्राह्मण विकास मोर्च्याद्वारे आयोजित कार्यक्रमात  बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेचे विविध उपक्रम आणि जीवनातील साधनेचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हिंदु संघटनांनी लोकशाहीच्या अपयशाविषयी सतत
जागृती करणे आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु संघटनांचे कार्य हिंदु समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील संकटांचा प्रतिकार करण्याचे आहे. आजच्या स्थितीत जेवढ्या काही हिंदूंच्या समस्या आहेत, त्यांचे मूळ सध्याची अपयशी ठरलेली विद्यमान लोकशाही आहे. या लोकशाहीने हिंदूंचेच नाही, तर सामान्य नागरिकांचेही कल्याण केलेले नाही. राज्यकर्त्यांची पोकळ आश्‍वासने आणि लोकशाहीद्वारे होणारे हिंदु समाजाचे शोषण रोखण्यासाठी हिंदु संघटनांनी लोकशाहीच्या अपयशाच्या संदर्भात सतत जागृती करणे, हा एकमात्र उपाय आहे. हे कार्य हिंदू संघटनांनी केल्यास येत्या काळात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करणे शक्य होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात