डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्चला

पुणे, १२ मार्च (वार्ता.) – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी १२ मार्चला झाली. या वेळी ‘मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या आरोपांच्या सुनावणीवर स्थगिती दिली आहे. त्यावर न्यायालयाकडून लवकरच आदेश मिळवू’, असे अभिवचन केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘सीबीआय’कडून) जिल्हा न्यायालयात देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ मार्चला ठेवल्याचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी सांगितले. या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्त्या (कु.) नीता धावडे, तर ‘सीबीआय’च्या वतीने अधिवक्ता विजयकुमार ढाकणे अन् अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग उपस्थित होते. या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना उपस्थित करण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात