अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – सौ. राजश्री प्रभु, सनातन संस्था

महिला दिनानिमित्त सनातनच्या साधिकेचा सत्कार !

सत्कार स्वीकारतांना सौ. राजश्री प्रभु

डोंबिवली (जिल्हा ठाणे), ११ मार्च (वार्ता.) – आज देशाची स्थिती पहाता महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, त्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेचा भावना निर्माण होत चालाली आहे. त्यामुळे या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. त्याचसमवेत प्रत्येक महिलेने धर्माचरण करणेही आवश्यक आहे, कारण त्यांच्यामुळेच एक आदर्श पिढी निर्माण होऊ शकते. यासाठी धर्मशिक्षण घेणे काळाची आवश्यकता आहे, यासाठी ठिकठिकाणी  स्वसंरक्षण आणि धर्मशिक्षण घेण्यात येतात, असे प्रतिपादन सनासन संस्थेच्या सौ. राजश्री प्रभु यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, डोंबिवली पश्‍चिम आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी सौ. राजश्री प्रभु यांचा स्तकार ही करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे पक्ष शहरप्रमुख श्री. भाई पानवडीकर यांनी केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात