सनातननिर्मित ग्रंथांचे राज्यभर विविध बसस्थानकांवर ग्रंथप्रदर्शन !

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने
एस्.टी. आगारांमध्ये लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद !

काही आगांरात सनातनच्या साधकांकडून मराठी भाषाविषयक मार्गदर्शन

कोल्हापूर

जिल्ह्यात कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी, तसेच गडहिंग्लज, इचलकरंजी, मलकापूर आणि कागल येथे हे प्रदर्शन लावण्यात आले होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही आगारात सनातनच्या साधकांनी मराठी भाषेच्या संदर्भात मार्गदर्शनही केले.

कोल्हापूर शहरात रंकाळा तलाव बस आगारात लावण्यात आलेल्या प्रदर्शनास सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री. नारायण खानु मोठे देसाई यांनी भेट देऊन कार्यास शुभेच्छा दिल्या. येथे ग्रामीण भागातील एका तरुण जिज्ञासूने आयुर्वेदिक ग्रंथ वाचून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. रंगाळा तलाव विभाग ज्यांच्या अंतर्गत येतो ते संभाजी आगाराचे व्यवस्थापक श्री. खांडेकर साधकांना पाहून म्हणाले, ‘मी तुमच्या येण्याची वाट पहात होतो. तुम्ही आलात ते चांगले झाले.’ रंकाळा येथील आगार व्यवस्थापकांनी साधकांची आपुलकीने चौकशी केली, तसेच अन्य सहकार्य केले. येथील वाहक-चालक यांनी विद्यार्थी-पालक यांच्या संदर्भातील ग्रंथ घेतले, तसेच आणखी ग्रंथांची मागणी केली. सनातनच्या प्रदर्शनाशेजारी अन्य दैनिकांच्या प्रदर्शनाचा कक्ष आहे. तेथील कर्मचार्‍यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनापासून प्रेरित होऊन प्रतिदिनचे दैनिक सनातन प्रभात वितरणासाठी ठेवू शकतो, असे सांगितले.

मलकापूर आगारात प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

मलकापूर येथे प्रदर्शन पहातांना मान्यवर आणि जिज्ञासू

मलकापूर येथे पहिल्या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. एन्.डी. पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पी.एल्. ओबाळे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी आगारप्रमुख श्री. वसंत शिवरामबुवा, येळाणे येथील सरपंच श्री. मधुकर पाटील, उपसरपंच श्री. सुरेश पटेल, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजाराम मोरे, धर्मप्रेमी श्री. सुनील भोसले, श्री. सुधाकर मिरजकर यांसह अन्य उपस्थित होते.

कागल आगार व्यवस्थापक श्री. प्रकाश शिंदे यांनी ‘‘तुमचे कार्य चांगले आहे. तुमच्यावर निरर्थक खोटे आरोप झाले आहेत. हे कार्य अनेकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुमचे सर्व उपक्रम समाजोपयोगी आहेेत.’’ असे गौरवोद्गार काढले !

सांगली जिल्ह्यात तासगाव आगारात सनातनच्या साधकांकडून मार्गदर्शन !

सांगली – सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, तासगाव आणि ईश्‍वरपूर येथील आगारांमध्ये प्रदर्शन लावण्यात आले होते. तासगाव येथे सनातनच्या साधिका कु. उज्वला खेराडकर यांनी आगारातील कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे महत्त्व, जागृती आणि मराठी वाचवण्यासाठी काय करावे, त्या संदर्भातील उपाययोजना हे विषय मार्गदर्शनात घेण्यात आले. या वेळी आगार व्यवस्थापक श्री. नामदेव पतंगे यांसह कर्मचारी, वाहक-चालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहक श्री. भरत थोरत यांनी केले.

सोलापूर

येथे १ ते ४ मार्च या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन लावले होते. या वेळी आगारचे व्यवस्थापक श्री. संजय भोसले यांनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली त्या वेळी ते म्हणाले, ‘‘बस स्टॅण्डवर विविध स्टॉल लागतात; पण तुमचे ग्रंथ चांगले आणि समाजोपयोगी आहेत.’’

लातूर

लातूर येथील बस स्थानक प्रमुख प्रदर्शनावर ग्रंथ पहातांना

५ मार्च या दिवशी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील श्री. राघोबा सोमवंशी यांनी स्वत:हून साहाय्य केले आणि त्यांनी ग्रंथप्रदर्शनाविषयी माहिती देण्यासाठी उद्घोषणा करण्यास अनुमती देऊन त्यांनी ६ मार्चलाही प्रदर्शन लावण्यास सांगितले.

अकलूज (जिल्हा सोलापूर)

येथे १ ते ३ मार्च या कालावधीत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिक आणि विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

अंबाजोगाई (जिल्हा बीड)

येथे ३ मार्च या दिवशी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या अनुमतीसाठी आगार प्रमुख आणि अन्य सहकार्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. बस स्थानकावरील फलकावर धर्मशिक्षणाचे लिखाण लिहिण्यासही अनुमती दिली.

जळगाव

येथील बसस्थानकात २ ते ५ मार्च असे ४ दिवस ग्रंथप्रदर्शन कक्ष लावले होते.  समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती या विषयांवरील ग्रंथांना जिल्ह्यातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला.

पुणे

२८ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, तळेगाव, राजगुरुनगर, जुन्नर, वल्लभनगर या ठिकाणीच्या बसस्थानकांवर ग्रंथप्रदर्शन लावले होते. आगारव्यवस्थापकांचेही यासाठी साहाय्य लाभले. सनातन संस्थेच्या वतीने यासाठी आभार व्यक्त करण्यात आले. स्वारगेट येथे अकलूज येथील एका आधुनिक वैद्यांनी सनातन-निर्मित १८ ग्रंथ विकत घेतले. त्यांनी जिज्ञासेने सर्व माहिती जाणून घेतली. जुन्नर बसस्थानक येथे माजी नायक तहसीलदार श्री. रेंगडे यांनी भेट दिली.

बारामती (जिल्हा पुणे) : येथे २ आणि ३ मार्च या दिवशी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासू श्री. मल्हार वाघमोडे यांनी २ मोठे ग्रंथ आणि ८ लघु ग्रंथ घेतले. प्रदर्शन पुष्कळ आवडल्याचे सांगितले.

पनवेल

येथील बसस्थानकावरही मराठी भाषा, आयुर्वेद आणि संस्कारविषयक सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज्यभरात एस्.टी. आगारामध्ये सनातन संस्थेला ग्रंथ प्रदर्शन लावण्याची अनुमती मिळाली होती. यात प्रामुख्याने मराठी भाषाविषयक, आयुर्वेद, विद्यार्थी-पालकांच्या संदर्भातील ग्रंथ जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत लावण्यात आले होते.

एस्.टी.आगाराने ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती देऊनही काही ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन लावण्यास आगार प्रमुखांनी विरोध केला. या वेळी परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणीही ग्रंथ प्रदर्शन लावण्यास अनुमती मिळाली.

(सनातनची अमूल्य ग्रंथसंपदा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते आणि राज्यातील सर्व संबंधित आगार व्यवस्थापक, तसेच या उपक्रमात सहभागी प्रत्येकाचे आभार ! – संपादक)

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात