‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन

शिक्षणातही धर्मांधांचे तुष्टीकरण चालू आहे, हे गंभीर ! – पू. नीलेश सिंगबाळ

धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना (१) पू. नीलेश सिंगबाळ आणि त्यांच्या डावीकडे श्री. चेतन राजहंस

फुलवारिया, पूर्व चंपारण (बिहार) – हिंदूंना हिंदु राजांचा इतिहास शिकवला जात नाही, तर अबकर किती थोर होता, हे शिकवले जाते. हुमायून, बाबर, औरंगजेब यांचे धडे इतिहासाच्या पुस्तकात असतात; पण मगधचे साम्राज्य, चाणक्य-चंद्रगुप्त यांचा पराक्रम, वैशालीचे वैभवशाली राज्य आणि त्याचे लिछवी राजे यांच्याविषयी माहिती दिलेली नसते. शिक्षणातही धर्मांधांचे तुष्टीकरण चालू आहे, हे गंभीर आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि भारताचा तेजस्वी इतिहास शिकवण्यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्रच हवे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

या कार्यक्रमाला ४० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर गावामध्ये प्रतिमास धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्‍चित झाले.

संदर्भ :  दैनिक सनातन प्रभात