पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) येथे धर्मरथाच्या माध्यमातून विहंगम धर्मप्रसार !

प्रदर्शनाचे पूजन करतांना श्री. दालूरामजी बोरल

पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) – येथील दत्त चौकातील श्री दत्त मंदिर येथे २८ फेब्रुवारीला सनातन संस्था प्रकाशित अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे धर्मरथ प्रदर्शन लावण्यात आले. या वेळी सौ. आणि श्री. दालूरामजी बोरले यांनी नारळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. धर्मरथाच्या चैतन्यामुळे एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन सहस्रोे जीवांना ज्ञान आणि चैतन्य ग्रहण करता आले. हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची सिद्धता दर्शवली. या धर्मरथ प्रदर्शनामुळे अनेक जिज्ञासू आणि जुने साधक सनातन संस्थेच्या धर्मकार्यात जोडले गेले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात