ब्रह्मपूर (बर्‍हाणपूर) येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग

विषय मांडतांना सौ. विमल कदवाने

ब्रह्मपूर, ७ मार्च (वार्ता.) – येथील मराठा समाज मंडळ, शिवाजीनगरच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते उज्जैनचे पूर्व संघप्रचारक श्री. आशिष शुक्ल, सनातनच्या साधिका सौ. विमल कदवाने, कु. साक्षी शिंदे, चि. नकूल शिंदे यांसह मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर कदम, श्री. दिलीप दिवेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर कु. साक्षी शिंदे हिने छत्रपति शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत पोवाडा सादर केला. चि. नकुल शिंदे याने भाषण केले. त्यानंतर सनातनच्या साधिका सौ. विमल कदवाने या वेळी म्हणाल्या की, जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर बालपणापासूनच सुसंस्कार केले. जिजामाता स्वत: नामस्मरण, धर्माचरण करत होत्या. आपणही कुलदेवतेचा नामजप करावा, धर्मशास्त्रानुसार तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करावा. सद्यस्थितीत महिलांवर होणारे अत्याचार, हिंदुत्वनिष्ठांच्या नित्याने होणार्‍या हत्या, मंदिर सरकारीकरण कायद्याचे होणारे दुष्परिणाम यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलांवर संस्कार करायला आपण अल्प पडत आहोत.

या वेळी ग्रंथकक्ष आणि पाक्षिक सनातन प्रभातचा कक्ष लावण्यात आला होता. या कार्यक्रमास ४०० धर्माभिमानी उपस्थित होते.

सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि माल्यार्पण करून छत्रपति शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलन करतांना या ठिकाणी मेणबत्तीचा वापर केला जात होता; परंतु सौ. कदवाने यांनी तत्परतेने त्यांना तेलाच्या दिव्याने दीपप्रज्वलन करण्याचे महत्त्व सांगितले. संयोजकांनी लगेचच तेलाचा दिवा उपलब्ध करून त्याने दीपप्रज्वलन केले. (धर्मशास्त्र कळल्यावर ते तत्परतेने कृतीत आणणारे, हीच खरी हिंदु धर्माची शक्ती आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात