धर्माचे रक्षण करणे, हेही धर्माचरणच ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

धर्मप्रेमी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना उजवीकडून श्री. चेतन राजहंस आणि श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

सौंधी, महाराजगंज (उत्तरप्रदेश) – सुखाचे मूळ धर्माच्या आचरणात आहे, तसेच धर्माचे आचरण करण्यासह त्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे, हेही धर्माचरण ठरते. धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता ईश्‍वरप्राप्तीमध्ये आहे; म्हणून आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. येथील ग्रामस्थ श्री. कृष्णकुमार यादव यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश-बिहारचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते.

या वेळी श्री. राजहंस यांनी ‘कुंकू लावणे, कुलदेवीची उपासना, ग्रामदेवतेेचे दर्शन, पितृपक्षात श्राद्धविधी करणे इत्यादी धर्माचरणाच्या कृती शिकवण्यासह मंदिरांचे रक्षण, लव्ह जिहादपासून हिंदु युवतींचे रक्षण, धर्मांतरापासून गरीब हिंदूंचे रक्षण आणि जिहादी आतंकवाद्यांपासून गावाचे रक्षण’, या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रवचनापूर्वी श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी समितीचे धर्मकार्य आणि कार्यातील ग्रामस्थांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात