नगर येथे धर्मरथातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भाजप खासदार दिलीप गांधी यांची सदिच्छा भेट

प्रदर्शनातील ग्रंथ पहतांना (१) खासदार दिलीप गांधी

नगर, ४ मार्च (वार्ता.) – चैतन्याचा स्रोत असलेले सनातनचे अमूल्य आणि भावस्पर्शी ग्रंथवैभव अन् सनातनची सात्त्विक उत्पादने यांचा धर्मरथ ३ मार्चला गांधी मैदान येथे आला होता. या धर्मरथाला भारतीय जनता पक्षाचे खासदार श्री. दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, नितीन शेलार, भैया गंधे, भाजप व्यापारी आघाडी मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश साखळा यांनी भेट दिली. ‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. सनातनचा धर्मरथ लावण्यात काही साहाय्य लागल्यास आम्ही नक्की सहकार्य करू’ असे खासदार गांधी यांनी सांगितले. या वेळी त्यांनी सनातेचे  ‘हिंदु राष्ट्र का हवे’, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’, ‘धर्मशिक्षण फलक’ हे ग्रंथही घेतले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात