धर्मरथाचे उद्घाटन आणि धर्मरथाच्या चैतन्यामुळे झालेला विहंगम प्रसार

नारळ वाढवतांना नगरसेवक श्री. धनराज भोंगळे आणि सनातनचे साधक

वणी – येथील साईमंदिरासमोर २७ फेब्रुवारीला सनातन संस्था प्रकाशित अनमोल  ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांची धर्मरथप्रदर्शने लावण्यात आली. धर्मकार्याची ओढ असलेले अपक्ष नगरसेवक श्री. धनराज भोंगळे यांनी नारळ वाढवून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. धर्मरथाच्या चैतन्यामुळे एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात प्रसार होऊन अनेकांना सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा लाभ घेता आला. या प्रदर्शनाच्या निमित्तनो अनेक नवीन जिज्ञासू संस्थेच्या कार्यात जोडले गेले.

या कार्यात निरपेक्ष भावाने सहभागी होणारे धर्मप्रेमी श्री. भगवान मेहता यांनी विद्युत पुरवठ्याची सोय केली. अनेक साधिकांनी आजूबाजूच्या परिसरात प्रसार करून ग्रंथ वितरण केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात