धर्मकार्य करतांना भगवंताचे अधिष्ठान आणि साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर येथे धर्मप्रेमींच्या शिबिराचे आयोजन

सोलापूर  – अर्जुनाच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण होता; म्हणून धर्म-अधर्माच्या युद्धात (महाभारतात) पांडवांची संख्या अल्प असूनही त्यांचा विजय झाला. त्यामुळे धर्मकार्य करतांना भगवंताचे अधिष्ठान आणि आपली साधना असणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. येथे ७ फेब्रुवारीला झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर उपस्थित धर्मप्रेमींसाठी ११ फेब्रुवारी या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी राष्ट्र आणि धर्मकार्य करतांना साधनेचे बळ पाठीशी असणे का आवश्यक आहे, या विषयावर त्या बोलत होत्या.

त्यानंतर माहिती अधिकाराचा वापर राष्ट्र आणि धर्मरक्षणार्थ कसा करावा ? याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले, तर राष्ट्र आणि धर्मरक्षण काळाची आवश्यकता आणि ते कसे करावे ? या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांना अवगत केले. या वेळी धर्मप्रेमींनी विविध शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.

क्षणचित्रे

१. या शिबिराला जिल्ह्यातील विविध गावांतून धर्मप्रेमी उपस्थित राहिले.

२. पुढील नियोजनासाठी ८ ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात