सोनगीर (धुळे) येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

धुळे, १० फेब्रुवारी – येथील रथ चौकात ७ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा पार पाडली. सभेला सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे यांनी मार्गदर्शन केले. सभेला ३ सहस्र हिंदूंची उपस्थिती लाभली.

सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांंनी सर्वांना राष्ट्र आणि समाज यांची दुःस्थिती, त्यावरील उपाय, साधनेचे महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. मम्मी नको, तर आई म्हणा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे यांनी महिलांची असुरक्षितता आणि महिलांनी झाशीची राणी होण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. स्वसंक्षण प्रशिक्षणाचे महत्त्वही त्यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले.

समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी हिंदु धर्म, हिंदूंवर होणारे आघात, गोहत्या, धर्मांतर यांविषयी सांगितले.  समितीच्या सुराज्य अभियानात सहभागी होण्याचेही त्यांनी सर्वांना आवाहन केले.

महिला आणि पुरुष यांच्यासाठी आढावा बैठक

सभेनंतरच्या आढावा बैठकीत उपस्थितांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी महिलांसाठी १० फेब्रुवारीला, तर पुरुषांसाठी १२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आढावा बैठक ठरवण्यात आली.

क्षणचित्रे

१. सभेला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

२. गावातील २ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाची अनुमती घेऊन प्रसार केला.

सभेनंतर गावातील दोन गट संघटित झाले !

येथे डिसेंबर महिन्यापर्यंत ३००/३०० युवकांचे २ गट होते. त्यातील ५०-५० युवक हाणामारी करायचे. धुळे येथील २५ डिसेंबर या दिवशीच्या सभेला ते उपस्थित होते.  तेव्हापासून गट-तट सोडून संघटितपणे रहाण्याचे त्यांनी ठरवले. सोनगीर येथील सभेचा गावातील प्रसार, बैठकांची पूर्वसिद्धता, महिलांना सभेसाठी एकत्रित करणे, भगवे झेंडे, बॅनर्स लावणे या सेवा त्यांनी मन लावून एकत्रितपणे केल्या. सभा यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज तेच संघटितपणे वागत आहेत. याचा चांगला परिणाम सोनगीर गावात आणि आजूबाजूच्या गावात झालेला दिसून येतो.

विशेष

गावात धर्मजागृती सभा असल्याने तेथील मशिदीवरील भोंगे वाजले नाहीत. (हिंदूसंघटनाचा असा दरारा सर्वत्रच निर्माण व्हायला हवा ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात