भोजशाळेची स्थापना झाल्यानंतर तिच्यावर इस्लामी आक्रमकांनी आणि स्वतंत्र भारतातील धर्मद्रोही राज्यकर्त्यांनी कशी आक्रमणे केली, याचा संक्षिप्त गोषवारा…

१. भोजराजाने श्री सरस्वतीदेवीची उपासना, हिंदू जीवन दर्शन आणि संस्कृत प्रसार या हेतूने वर्ष १०३४ मध्ये धार येथे भोजशाळेची निर्मिती केली.

२. वर्ष १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने माळवा प्रांतावर आक्रमण केले आणि भोजशाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची विटंबना केली.

३. वर्ष १५१४ मध्ये मेहमूदशाह खिलजीने भोजशाळेच्या बाहेर अतिक्रमण करून तेथे कमाल मौलानाचे थडगे उभारले.

४. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्जन याने भोजशाळेतील सरस्वतीदेवीच्या मूर्तीची चोरी करून ती इंग्लंडमध्ये नेऊन ठेवली. आजही ती प्रतिमा लंडन येथील संग्रहालयात आहे.

५. शेकडो वर्षांपासून चालू असलेल्या भोजशाळेच्या आक्रमणाच्या इतिहासाला भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १५.५.१९९७ या दिवशी वेगळे वळण लागले. काँग्रेसचे तत्कालिन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या अध्यादेशानुसार भोजशाळेतील सर्व प्रतिमा काढून टाकण्यात आल्या आणि भोजशाळेला मशीद म्हणून मान्यता देण्यात आली. हिंदूंना केवळ वर्षातून एकदा वसंतपंचमीच्या दिवशी विविध अटी लादून भोजशाळेत प्रवेशाची अनुमती देण्यात आली.

६. काँग्रेस शासनाने १८.२.२००३ म्हणजे वसंतपंचमीच्या दिवशी अघोषित संचारबंदी लागू करून भोजशाळेत पूजेसाठी जमलेल्या भाविकांवर लाठीमार करण्यात आला. लहान मुलांसह ४० महिला अन्य शेकडो हिंदूंना अटक करण्यात आली. १ सहस्र २३४ हिंदूंवर हत्या वा हत्येचा प्रयत्न केल्याचे खोटे आरोप लावण्यात आले. १४ निर्दोष कार्यकर्त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली.

७. भोजशाळा मुक्तीसंघर्षाच्या आंदोलनावर काँग्रेस शासनाने केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे ख्रिस्ताब्द २००३ मध्ये प्रक्षुब्ध हिंदूंकडून भाजपला निवडून देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र भाजपकडे राज्याची सत्ता येऊनही भोजशाळा मुक्तीच्या संदर्भात हिंदूंच्या पदरात निराशाच पडली.

८. वर्ष २००६ मध्ये शुक्रवारीच वसंतपंचमी आल्याने या दिवशी नमाजपठण न होता केवळ हिंदूंनाच पूजेची अनुमती मिळावी, अशी हिंदूंनी केलेली मागणी राज्यशासनाकडून धुडकावण्यात आली. याला विरोध करणार्‍या हिंदूंवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यशासनाकडून अत्याचार करण्यात आले आणि १६४ हिंदूंवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले.

९. वर्ष २००६ नंतर पुन्हा वर्ष २०११ मध्ये राज्यशासनाचे हिंदूद्वेष्टे स्वरूप स्पष्ट झाले. राज्यशासनाने भोजशाळेतील श्री सरस्वतीदेवीची नवी मूर्ती जप्त करून ती कारागृहात ठेवली. हिंदूंनी केलेल्या आंदोलनानंतर मूर्ती भोजशाळेत पुनःप्रतिष्ठापित करण्यात आली.

१०. वर्ष २०१२ मध्ये राज्यशासनाने पुन्हा वसंतपंचमीच्या पूर्वीच श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला दुसर्‍यांदा कारागृहात ठेेवले आणि सरस्वती जन्मोत्सवावर प्रतिबंध घातले.

११. वर्ष २०१३ मध्ये वसंतपंचमीच्या दिवशी राज्यशासनाने पुन्हा त्याचे अमानुष क्रौर्य दाखवत भोजशाळेत पूजनासाठी जमलेल्या हिंदूंवर अमानुष लाठीमार केला. या लाठीमारामुळे अखेर हिंदूंना निर्णायक लढ्याची चेतावणी देणे भाग पडले.

१२. १३ फेब्रुवारी २०१६ ला झालेल्या वसंतपंचमीच्या दिवशी भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे सरस्वती मातेची पूजा करता येण्याच्या हिंदूंच्या न्याय्य मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. नमाजपठणासाठी उपस्थित अवघ्या २५ मुसलमानांसाठी सहस्रावधी हिंदूंना पूजासाहित्य बाहेर ठेऊनच भोजशाळेत प्रवेश देण्याच्या मध्यप्रदेशातील भाजप शासनाच्या भूमिकेला हिंदूंनी तीव्र आक्षेप नोंदवला. हिंदूंनी भोजशाळेत जाण्यावर बहिष्कार घातला. प्रथमच भोजशाळेच्या बाहेर होमहवन आणि पूजा करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात