भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील ४ दिवसीय अध्यात्म आणि सेवा मेळ्यात सनातन संस्थेद्वारे ग्रंथप्रदर्शन

प्रदर्शनाला भेट देणारे माजी आमदार श्री. प्रताप सडांगी (डावीकडे) यांना पंचांग भेट देतांना सनातन संस्थेचे श्री. प्रकाश मालोंडकर

राऊरकेला (ओडिशा) – १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत भुवनेश्‍वर येथील एक्झिबिशन ग्राऊंड येथे अध्यात्म आणि सेवा मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये विविध संघटना आणि संस्था यांनी त्यांचे कार्य दर्शवणारे केंद्र (स्टॉल्स) उभारले आहेत. सनातन संस्थेद्वारे आध्यात्मिक, राष्ट्रविषयक आणि आरोग्यविषयक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीद्वारे राष्ट्र आणि धर्म यांविषयक फलक लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासू, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ, विविध क्षेत्रात काम करणारे तथापि धर्म आणि राष्ट्र विषयक कार्यात रूची असणार्‍या अनेक व्यक्ती आवर्जून भेट देऊन त्याचा लाभ घेत आहेत. माजी विधानसभा सदस्य आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रताप सडंगी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्थेच्या कार्याची, तसेच प्रकाशनांची माहिती करून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात