प्रयाग येथे माघ मेळ्यातील सनातनच्या ग्रंथ आणि फलक यांच्या प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी

प्रयाग (उत्तरप्रदेश) – प्रयाग येथील पवित्र त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी भरलेल्या माघ मेळ्यात लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि फलक यांच्या प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. २ जानेवारीला चालू झालेला माघ मेळा ३१ जानेवारी पर्यंत असणार आहे. या ग्रंथप्रदर्शनात सनातनचे विविध विषयांवरील ग्रंथ, तसेच सात्विक उत्पादने यांचा समावेश आहे. याशिवाय येथे पाश्‍चात्त्य ‘डे’ज्, लव्ह जिहाद, युवा संघटन आदींविषयी प्रबोधन करणारे  राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे फलकही लावण्यात आले आहेत.

या प्रदर्शनास माजी मेळाधिकारी श्री. हरिओम शर्मा, बनारस हिंदु विद्यापिठाचे श्री. वेदव्यास मिश्र यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात