विजयवाडा येथील ‘बूक फेअर’मध्ये लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रो जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विजयवाडा – येथे प्रतिवर्षी ‘बूक फेअर’ (पुस्तक प्रदर्शन) आयोजित करण्यात येते. या वर्षी १ ते १२ जानेवारी या कालावधीत हे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध ३०० हून अधिक प्रदर्शनकक्ष लावण्यात आले होते. सनातनच्या वतीने तेलुगु भाषेतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा प्रदर्शनकक्ष, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचा प्रदर्शनकक्ष लावण्यात आला होता. १२ दिवसांत या प्रदर्शनकक्षाला सहस्रो जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही जण सनातन प्रभात नियतकालिकांचे वर्गणीदारही झाले.

क्षणचित्रे

१. गेल्या वर्षी पुस्तक प्रदर्शनात ज्या जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनावरून ग्रंथ विकत घेतले होते, त्यांनी या वर्षीही प्रदर्शनकक्षाला भेट दिली आणि ‘सनातनचे ग्रंथ वाचून पुष्कळ लाभ झाला. या ग्रंथांतील माहिती फार उपयुक्त असून ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे’, असे सांगून अन्य काही ग्रंथही खरेदी केले.

२. काही जिज्ञासूंनी सांगितले की, तुमच्या ग्रंथांचे मूल्यही पुष्कळ अल्प आहे. अन्य ठिकाणी एवढ्या अल्प मूल्यात ग्रंथ आणि उत्पादने मिळत नाहीत. हे ग्रंथ नातेवाईक, मित्र किंवा अन्य कोणालाही भेट म्हणून देण्यासही उपयुक्त आहेत.

३. सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केलेल्या व्यक्तींनी ‘ही उत्पादने विजयवाडा येथेही उपलब्ध करून दिल्यास पुष्कळ चांगले होईल. त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व साहाय्य करण्यास सिद्ध आहोत’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात