रायगड जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापक संघाच्या कृतीसत्रात ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि नैतिक मूल्ये’ या विषयावर सनातन संस्थेकडून मार्गदर्शन

आवास (अलिबाग) – येथील बाबासाहेब नाझरे विद्यालयात रायगड जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि नैतिक मूल्ये’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक तसेच रायगड भूषण पुरस्कार प्राप्त श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी १३५ हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या बालसंस्कार मालिकेतील ७ ग्रंथांची सर्वांना माहिती देण्यात आली. १० शाळांनी हे ग्रंथ खरेदी करण्यासाठी मागणी केली आणि ४० मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमध्ये या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले.

या वेळी शिक्षक आमदार श्री. बाळाराम पाटील, माध्यमिक विभागाचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आवारी साहेब, तसेच यशदा चाणक्य संस्थेचे मार्गदर्शक डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात