सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापिठात मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील शारदा विद्यापिठामध्ये १२ जानेवारी या दिवशी सनातनचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मन:शांतीसाठी नामजपाच्या पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी मन कसे कार्य करते ? मनातील नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी आणि मन:शांतीसाठी नामजप करणे महत्त्वाचे कसे आहे, याविषयी माहिती दिली. राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने शारदा विद्यापिठाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये फेथ फाऊन्डेशनचे अध्यक्ष कर्नल अशोक किणी आणि योगाचार्य विपिन यांनीही संबोधित केले. या मार्गदर्शनाचा लाभ १०० हून अधिक शिक्षकांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात