संत श्री गजानन महाराजांच्या महादर्शन सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार

सोहळ्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले प्रदर्शन

बडनेरा, (अमरावती) – येथील एक भक्त श्री. आणि सौ. देवरणकर यांच्या निवासस्थानी संत श्री गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या दर्शन सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला. दुपारी महाराजांच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली. ह.भ.प. पुंंडलिकराव सपाटे, ह.भ.प. गणेश महाराज सपाटे, ह.भ.प. प्रणय गाढे यांनी हरिपाठ केला. अमरावती येथे ११ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश मालोकार यांनी या वेळी दिले. सायंकाळी महाराजांची महाआरती करण्यात आली. पादुकांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात