सैनिकांचे खच्चीकरण करणारा देशविरोधी कृत्ये करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा आत्मघातकी निर्णय मागे घ्या ! – सनातन संस्था

नाशिक येथे हिंदुत्वनिष्ठांची उपजिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

नाशिक – काश्मीर खोर्‍यात सैनिकांवर दगडफेक करणे, भारताचा राष्ट्रध्वज जाळणे, भारतविरोधी घोषणा देणे आदी अनेक देशविरोधी कृत्ये करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेणे, हा सैनिकांचे खच्चीकरण करणारा आत्मघातकी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशा मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी उपजिल्हाधिकरी श्री. रामदास खेडकर यांना दिले. ‘पद्मावती’ चित्रपटातील घूमर गाणे वगळावे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाला हा चित्रपट दाखवून त्यांचे शंकानिरसन करूनच मगच त्याला प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गौरव जमधडे, सनातन संस्थेचे श्री. सोनेकर आणि श्री. पुराणिक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात