‘पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करू नका !’, याविषयी जागृती करण्यासाठी बनवलेली फेसबूक फ्रेम ६४ सहस्रांहून अधिक जणांनी वापरली !

मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांच्या वतीने ‘नववर्ष ३१ डिसेेंबर ऐवजी हिंदु संस्कृतीनुसार चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला साजरे करा’, याविषयी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यासाठी एक ‘फेसबूक फ्रेम’ बनवण्यात आली होती. या ‘फ्रेम’मध्ये ‘माझे नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला’, असा मथळा देऊन ती सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या ‘फेसबूक’च्या अधिकृत खात्यांवर ‘प्रोफाईल छायाचित्र’ म्हणून ठेवण्यात आली होती. हे पाहून ६४ सहस्रांहून अधिक जणांनी स्वत:चे ‘फेसबूक प्रोफाईल’ म्हणून या ‘फ्रेम’चा वापर करून समाजात जनजागृती केली.

काय आहे ‘फेसबूक फ्रेम ?’

‘फेसबूक’ने ‘स्वत:च्या खात्याच्या चित्राला विविध स्वरूपातील, तसेच हव्या त्या पद्धतीची ‘फ्रेम’ देऊ शकतो’, अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यालाच ‘फेसबूक फ्रेम’ असे म्हटले जाते. ज्या फेसबूक खात्यावर ही ‘फ्रेम’असेल, त्या खात्यावरून स्वतःचे मित्र अथवा ‘फेसबूक’वरील कोणतीही व्यक्ती ती स्वत:चे ‘फेसबूक प्रोफाईल’ म्हणून वापरू शकतेे. अशा प्रकारे त्या ‘फ्रेम’च्या माध्यमांतून प्रसार होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात