एर्नाकुलम् (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन

एर्नाकुलम् (केरळ) – येथे ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन घेतले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या सामाजिक परिस्थितीत मनःशांती टिकून रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनात साधनेचे महत्त्व अनन्यसाधारण असून सर्व समस्यांवर साधना करणे, हाच उपाय आहे. या प्रवचनास २५ कुटुंबे उपस्थित होती.

या वेळी या कुटुंबांतील अनेकांनी कुलदेवतेचा नामजप, तसेच साधना यांविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. काहींनी त्यांच्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण होण्यासाठी साधना कशी करावी, याविषयी जाणून घेतले. अनेकांनी अशा प्रकारचे प्रवचन त्यांच्या परिसरात घेण्याची मागणीही अनेकांनी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात