वणी (यवतमाळ) येथे प्रथमोपचार शिबीर !

घायाळ व्यक्तीला सुरक्षित जागी हालवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतांना

वणी (यवतमाळ) – येथील गणेश गृहनिर्माणमधील सौ. काळे यांच्या सभागृहात प्रथमोपचार शिबीर घेण्यात आले. या वेळी जिल्हा प्रथमोपचारसेविका कु. दीपा चांदेकर, पल्लवी यांनी विंचूदंश, सर्पदंश, श्‍वानदंश झाल्यानंतरची लक्षणे आणि त्यावरील उपचार यांविषयी सांगितले. यासमवेतच वीजेचा धक्का लागणे, वीज कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर घ्यावयाची काळजी यांविषयीही मार्गदर्शन केले. अपघातग्रस्त, घायाळ किंवा अधू झालेल्या व्यक्तीला सुरक्षित जागी कसे हालवावे ? ऐनवेळी घरगुती स्ट्रेचर कसे सिद्ध करावे ? याची शिबिरार्थींकडून प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. १४ जणांनी याचा लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात