पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करणार्‍या व्यक्ती आणि सभोवतालचे वातावरण यांवर होणार्‍या परिणामांची पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता आणि स्पंदने

१ अ. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के

१ आ. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील त्रासदायक स्पंदने : ३० टक्के

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

 

२. सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

२ अ. अहं

२ अ १. अहंचे वलय व्यक्तीच्या अनाहत चक्रस्थानी निर्माण होऊन ते कार्यरत होणे

२ आ. मायावी शक्ती

२ आ १. मायावी शक्तीचे वलय व्यक्तीच्या तोंडवळ्याभोवती निर्माण होऊन ते कार्यरत होणे

पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे करण्याची व्यक्तीमध्ये असलेली उत्सुकता ही मानसिक स्तरावरील असल्याने असे होते.

२ आ २. मायावी शक्तीचे वलय व्यक्तीकडून नकळतपणे वातावरणात प्रक्षेपित होणे

परिणामी इतर व्यक्तीही पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे करण्याकडे आकर्षित होतात.

२ इ. त्रासदायक शक्ती

२ इ १. त्रासदायक शक्ती व्यक्तीभोवती निर्माण होऊन ती कार्यरत होणे

परिणामी व्यक्ती अतीक्रियाशील होऊन तिच्या इच्छा आणि वासना वाढतात.

२ इ २. त्रासदायक शक्ती ठिणग्यांच्या स्वरूपात वातावरणात आपोआप प्रक्षेपित होणे

त्यामुळे वातावरणातील त्रासदायक शक्तीचे प्रमाण वाढते. याचा विपरीत परिणाम स्वतःवर होत आहे, याविषयी व्यक्ती मात्र अनभिज्ञ असते.

२ इ ३. त्रासदायक शक्तीचा प्रवाह पाताळातून व्यक्तीकडे प्रवाहित होणे

ही त्रासदायक शक्ती नकळतपणे व्यक्तीच्या देहाला वेढून रहाते आणि व्यक्तीला मायावी आनंद देते.

२ इ ४. त्रासदायक शक्तीचे आवरण व्यक्तीच्या देहाभोवती असणे आणि ते कंपनांच्या स्वरूपात जलद गतीने वाढणे

२ इ ५. त्रासदायक शक्तीचे कण वातावरणात कंपनयुक्त स्वरूपात प्रवाहित होणे

व्यक्ती पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नवीन वर्ष साजरे करत असल्याने असे होते.

२ ई. वाईट शक्ती

२ ई १. वाईट शक्ती (भुते) पाताळातून पृथ्वीवर येणे

पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरे करण्यार्‍या व्यक्तींसमवेत तीही आनंदाने सहभागी होतात.

२ ई २. वातावरणातील वाईट शक्ती (भुते) व्यक्तींकडे आकर्षित होणे

वातावरणातील वाईट शक्ती (भुते) अनियंत्रित प्रकारे आणि शीघ्रतेने नववर्ष साजरे करण्यार्‍या व्यक्तींच्या अवतीभोवती फिरत रहातात.

 

३. पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार नववर्ष साजरा करण्याच्या संदर्भातील अन्य सूत्रे

अ. असे नववर्ष साजरे करणे, हे ५ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचेच नियोजन असून वाईट शक्ती याचा लाभ घेतात. आध्यात्मिकदृष्ट्याही ते अयोग्य असून त्यात थोडीही सात्त्विकता नसते.

आ. नववर्ष साजरे करणार्‍या व्यक्तींवर मायावी शक्तींचाच प्रभाव असल्याने व्यक्तींना मिळणारे सुख हे मायावी आणि मानसिक स्तरावरील असते. परिणामी व्यक्तींतील अहं वाढत असून त्यांच्याकडे त्रासदायक शक्ती आकर्षित होतात.

इ. अशा पद्धतीने साजरे होणारे कार्यक्रम ५ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना आवडत असून ते व्यक्तींमधील चांगली शक्ती खेचून घेतात. त्यामुळे कार्यक्रमानंतर व्यक्तींना मरगळ येते. त्याचप्रमाणे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्तींतील त्रासदायक शक्तीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्यांच्या देहाभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरणही वाढते. त्यामुळे व्यक्तींचे मन मायेतच रममाण होऊन त्यांच्या कृतीही अयोग्य दिशेनेच होतात.

ई. या कालावधीत होणार्‍या आवाजामुळे (ध्वनीमुळे) प्रचंड दाब निर्माण होतो. परिणामी यात सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये, तसेच वातावरणातही पुष्कळ प्रमाणात त्रासदायक शक्ती निर्माण होते.

– (पू.) सौ. योया वाले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.११.२०१७)

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र

काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र असे म्हणतात.

या सूक्ष्म चित्रातून त्रासदायक स्पंदने येत असल्यामुळे सूक्ष्मचित्राभोवती आणि लिखाणाच्या भोवती नामजपाचे मंडल घातले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात