भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील ‘राजधानी बूक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

भुवनेश्‍वर – येथील ओडिशा राज्यात आयोजित करण्यात येणार्‍या पुस्तकमेळ्यांमधील अग्रस्थानी असलेल्या ‘राजधानी बूक फेअर’ या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या पुस्तकमेळ्यामध्ये सनातन संस्थेद्वारा अध्यात्म, धर्माचरण, राष्ट्ररक्षण तथा आरोग्य विषयक ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करून सहभाग घेतला.

ग्रंथ प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारा हा पुस्तकमेळा या वर्षी १ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. १२ दिवस चाललेल्या या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ओडिशा राज्यातील, तसेच अन्य राज्यांतील प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था, आध्यात्मिक संस्था आणि ग्रंथ विक्रेते इत्यादींनी सहभाग घेतला होता. सनातनच्या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्याबरोबर धर्मशिक्षण देणारे फलकही लावण्यात आले होते. शेकडो वाचक आणि जिज्ञासू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ अन् उत्पादने खरेदी केले. स्थानिक उडिया भाषेतील ग्रंथ आणि वर्ष २०१८ चे उडिया भाषेतील सनातन पंचांग यांना वाचकांकडून विशेष मागणी होती. तसेच अनेक धर्माभिमानी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे प्रतिनिधी आदींनीही या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृतीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील ४ दिवसीय अध्यात्म आणि सेवा मेळ्यात सनातन संस्थेद्वारे ग्रंथप्रदर्शन

प्रदर्शनाला भेट देणारे माजी आमदार श्री. प्रताप सडांगी (डावीकडे) यांना पंचांग भेट देतांना सनातन संस्थेचे श्री. प्रकाश मालोंडकर

राऊरकेला (ओडिशा) – १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत भुवनेश्‍वर येथील एक्झिबिशन ग्राऊंड येथे अध्यात्म आणि सेवा मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये विविध संघटना आणि संस्था यांनी त्यांचे कार्य दर्शवणारे केंद्र (स्टॉल्स) उभारले आहेत. सनातन संस्थेद्वारे आध्यात्मिक, राष्ट्रविषयक आणि आरोग्यविषयक ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच या प्रदर्शनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीद्वारे राष्ट्र आणि धर्म यांविषयक फलक लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला अनेक जिज्ञासू, तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ, विविध क्षेत्रात काम करणारे तथापि धर्म आणि राष्ट्र विषयक कार्यात रूची असणार्‍या अनेक व्यक्ती आवर्जून भेट देऊन त्याचा लाभ घेत आहेत. माजी विधानसभा सदस्य आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रताप सडंगी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सनातन संस्थेच्या कार्याची, तसेच प्रकाशनांची माहिती करून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात