गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदु आध्यात्मिक सेवा मेळ्यामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शन

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथप्रदर्शनावर ग्रंथ पहातांना जिज्ञासू

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ४ दिवसीय हिंदु आध्यात्मिक सेवा मेळ्याचे आयोजित करण्यात आले होते. यात सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथ्रदर्शनाचा काही सहस्र जिज्ञासूंनी लाभ घेतला.

क्षणचित्रे

१. प.पू. दाती मदन महाराज यांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि सनातनचे कार्य समजून घेतले.

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन पाहून येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक समरजीत सिंह यांनी कौतुक केले. ‘हा अतीउत्तम प्रयत्न आहे’, असे ते म्हणाले.

३. केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी असणार्‍या येथील डॉ. अमिता सोलंकी ग्रंथ पाहून म्हणाल्या, ‘‘या प्रकारचे आध्यात्मिक कार्य अन्यत्र कुठेही दिसून येत नाही. या ग्रंथांमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने अधत्यात्माला यंत्रांद्वारे सिद्ध करून दाखवले हे अद्भुत आहे. याचा संपूर्ण देशात प्रसार झाला पाहिजे. यासाठी माझ्याकडून शक्य होईल, तितका मी प्रयत्न करीन.’’

४. उत्तरप्रदेश सरकारमधील वनमंत्री श्री. उपेंद्र तिवारी यांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

५. एका जिज्ञासूने ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली आणि म्हटले, ‘‘ही तिच संस्था आहे ना जिचे संस्थापक डॉक्टर आहेत आणि त्यांनी ७ वर्षे इंग्लंडमध्ये अभ्यास केल्यानंतर अध्यात्माचे महत्त्व जाणले आणि ते पूर्णपणे साधनेकडे वळले. (या जिज्ञासूचे वाक्य ऐकल्यावर प.पू. डॉक्टरांची महानता आता समाज ओळखू लागली आहे. त्यांचे नाव आता जगभर होत आहे, हे आता सत्य होऊ लागले आहे. त्यामुळे खूप आनंद मिळाला आणि कृतज्ञता व्यक्त झाली. – कु. कृतिका खत्री)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात