चिंचवड येथे धर्मरथातील ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंचवड – चैतन्याचा स्रोत असलेले सनातनचे अमूल्य आणि भावस्पर्शी ग्रंथवैभव अन् सनातनची सात्त्विक उत्पादने यांच्या धर्मरथाचे चिंचवड परिसरात आयोजन करण्यात आले होते. २७ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीमध्ये नाशिक रस्ता ते चिंचवड या परिसरात धर्मरथ प्रदर्शन लावण्यात आले. ७ डिसेंबर या दिवशी तानाजीनगर मधील गजानन महाराज मंदिराजवळ धर्मरथ ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत करण्यात आले होते. त्याचे पूजन भाजपचे नगरसेवक श्री. राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कालावधीत प्रदर्शनाला स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. प्रदर्शनात २०५ मोठे ग्रंथ आणि १९० लघु ग्रंथ वितरण झाले.

२. डांगे चौक येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनास मोरगाव येथील एका जिज्ञासूने भेट दिली. त्याने मोरगाव येथे प्रदर्शन लावण्याविषयी तसेच त्यासाठी स्वत:हून अनुमती मिळवून देण्याविषयी सांगितले.

३. या कालावधीत प्रत्येक वर्षी आपण ज्या भागात प्रदर्शन लावतो, तेथे प्रदर्शनासाठी सहजपणे जागा उपलब्ध झाल्या.

४. भोसरी आणि डांगे चौक येथील धर्मरथ प्रदर्शनाच्या वेळी परिसरातील वैद्यांना साधकांनी भेट दिली. या वेळी एका वैद्यांनी सांगितले, ‘‘माझे कुठे कार्यक्रम असल्यास तेथे तुम्ही प्रदर्शन लावू शकता.’’

५. शाहूनगर भागातील एका व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी मंदिराबाहेर प्रदर्शन लावण्याची मागणी केली.

६. तापकीर चौकात मूळचा धुळे येथील आणि सध्या पुण्यात नोकरीनिमित्त आलेला एक जिज्ञासू युवक प्रदर्शनावर भेट देण्यासाठी आला. तो बालपणी सनातनच्या बालसंस्कारवर्गात जात होता. आता पुण्यात ज्या भागात तो रहातो तेथे कार्य चालू करूयात, असे त्याने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात