पिसावली (कल्याण) येथील धर्मजागृती सभेत सनातन संस्थेचा सहभाग

हिंदु युवकांनी असीम शौर्य गाजवण्याची
आवश्यकता आहे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

कार्यक्रमाला उपस्थित धर्माभिमानी

कल्याण – हिंदु राष्ट्र हे स्वप्न नसून संकल्प आहे. हा संकल्प साक्षात भगवंताचा आहे. हिंदु युवकांनी साधना करून संघटन दाखवून असीम शौर्य गाजवण्याची आवश्यकता आहे. हिंदूंना पराक्रमाचा इतिहास आहे. शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास आपल्याला केवळ पठण करण्यासाठी नसून त्यातून आदर्श घेऊन कृतीत आणण्यासाठी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी कल्याण जिल्हा परिषद मराठी शाळेचे मैदान, पिसावली गाव येथे घेण्यात आलेल्या शौर्य जागरण कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाचा लाभ १०० धर्मप्रेमींनी घेतला.

श्री. वडके पुढे म्हणाले, श्रीकृष्णाने भगवद्गीता ही युद्ध मैदानात सांगितली आहे. युद्धाविना श्रीरामालाही राज्य मिळाले नाही. त्यामुळे रामभक्तांनी राज्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र मिळेल, या भ्रमात न रहाता हिंदु राष्ट्र या ध्येयाने संघटित होऊन शौर्य प्रशिक्षणासाठी प्रयत्न करूया.

सहभागी संघटना आणि पक्ष

हिंदु राष्ट्र सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवशाही प्रतिष्ठान, अखंड हिंदु, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, मनसे, विश्‍व हिंदु परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती

क्षणचित्रे

१. लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांना सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२. पद्मावती चित्रपटाच्या विरोधात करण्यात येणार्‍या आंदोलनातही सहभागी होणार असल्याचे सर्वांनी सांगितले.

३. दोन गावांमधून स्वंरक्षण प्रशिक्षणाची मागणी करण्यात आली.

४. हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आशिष पांडे यांनी सभेसाठी पुढाकार घेतला.

५. कार्यक्रमाच्या शेवटी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने एका लहान मुलाने ध्येयमंत्र म्हटला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात