अमरावती येथे विविध ठिकाणी सनातन प्रभातच्या वाचक मेळाव्यांचे आयोजन

गाडगेनगर (अमरावती) – येथे सनातन प्रभात नियतकालिकांच्या वाचकांचा मेळावा १ डिसेंबरला पार पडला. वाचकांचे उत्स्फूर्त मनोगत, त्यांना आलेल्या अनुभूती, तसेच धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली, हे मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.

श्री. योगेश मालोकार यांनी मेळाव्याचा उद्देश, सनातन प्रभातच्या वतीने राबवले जाणारे उपक्रम यांविषयी वाचकांना सांगितले.

श्री. गिरीश कोमेरवार यांनी गुरुकृपायोेगानुसार साधनेचे महत्त्व, साधनेचे मूलभूूत टप्पे यांविषयी सांगितले. अंबा पेठ आणि साई नगर या विभागातही वाचकांचे मेळावे पार पडले. अमरावती शहरात झालेल्या तीन वाचक मेळाव्यांना मिळून एकूण ४० वाचकांची उपस्थिती लाभली. गटचर्चेतील वाचकांनी रविवारी होणार्‍या सत्संगात नियमित उस्पथित रहाणार, अशी सिद्वता दर्शवली.

विशेष सहकार्य – रंगोली लॉनचे श्री. नितीन देशमुख, तर अंबा मंगलम्चे श्री. गणेश बहाळे यांनी वाचक मेळाव्यासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. श्री. पवन राऊत यांनी बसण्यासाठीचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

 

वाचकांचे मनोगत

  • सनातन प्रभात हा चैतन्यदायी अंक आहे. सनातन प्रभात ही काळाची आवश्यकता झाली आहे. – सौ. कमलताई चौधरी
  • सनातन प्रभातमधून सकारात्मक ऊर्जा मिळते. – सौ. जयश्री बोबडे
  • हिंदूंच्या आघातावर प्रघात करणारे एकमेव नियतकालिक म्हणजे सनातन प्रभात ! – श्री. राम वाजपे

 

कोपरगांव (जिल्हा नाशिक) येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी वाचक मेळाव्याचे आयोजन

कोपरगांव  – येथे १ डिसेंबर या दिवशी सनातन प्रभातच्या वाचकांसाठी वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन प्रभातमुळे विश्‍वभरातील हिंदूंमध्ये धर्मबंधुत्वाची भावना वाढीस लागली आहे. त्यांच्यामध्ये जवळीकता आणि प्रेम वाढले आहे. सनातन प्रभातमुळे विश्‍वभरात हिंदु धर्माविषयी जागरूकता निर्माण होते, असे  प्रतिपादन श्री. शिवाजी उगले यांनी या वाचक मेळाव्यात केले. साधनेचे महत्त्व सनातनच्या सौ. वनिता आव्हाड यांनी विशद केले.

वाचकांनी सनातन प्रभातमुळे त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या.

वैशिष्ट्यपूर्ण

१. महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

२. गटचर्चेद्वारे महिलांनी चांगला सहभाग घेऊन सेवा करण्याची सिद्धता दर्शवली.

३. गटचर्चेतून नवीन सत्संगाची मागणी करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात